राणाने दिले अंजलीला वाढदिवसाचे हटके गिफ्ट

tuzyat jiv rangla

टीम महाराष्ट्र देशा –  झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या  झोकात आहे. या सिरीयलचे अनेक चाहते आहेत. सध्या या सिरीयलमध्ये राणा दा वज्र केसरीसाठी तयारी करीत आहे. राणादा एव्हाना आता सर्वांचाच फेव्हरेट झालाय. त्याने पत्नी अंजली पाठक हिला खास अनोखे गिफ्ट दिले.

हाच राणादा आता कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करताना दिसणार आहे. राणादाची ही कुस्ती रंगलीय कोल्हापुरच्या इचलकरंजीतील व्यंकोबा मैदानात. ह्याच मैदानात या स्पेशल एपिसोडचं शूटिंग करण्यात आलंय.सगळ्यात महत्वाचं म्हणजे राणादाची ही कुस्ती अंजली पाठक यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण याच दिवशी अंजलीचा वाढदिवसही आहे. राणादाने हा आखाडा मारत वाढदिवसाचे आगळे वेगळे गिफ्ट दिले.