पराभवानंतरही भाजपच्या ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रीपद

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सर्वत्र नरेंद्र मोदींची त्सुनामी आपल्याला पाहायला मिळाली. विशेष म्हणजे राज्यात युतीचे ४१ उमेदवार तर महाआघाडी चे ६ उमेदवार विजयी झाले आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर विरुद्ध कॉंगेसचे बाळू धानोरकर अशी चुरशीची लढत झाली. या लढतीमध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा दारूण पराभव केला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जन्मगावात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुळ गाव असलेल्या चंद्रपुरात भाजपचा पराभव करणारे बाळू धानोरकर हे कॉंगेसचे एकमेव उमेदवार आहेत.

Loading...

या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर यांचा पराभव झाल्याने त्यांना मंत्रीपद मिळणार का?, अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला नितीन गडकरींनी पूर्णविराम दिला आहे. ‘माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाला असला तरीही त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात येईल’, असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. त्यामुळे हंसराज अहिर यांना कोणते मंत्रीपद मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

दरम्यान, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी त्याला सुरंग लावत हंसराज अहिर यांचा पराभव केला .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात