भारतातील हे अब्जाधीश दांपत्य करणार आपली संपत्ती दान

जाणून घ्या सविस्तर कोण आहे हे दांपत्य?

टीम महाराष्ट्र देशा – बिल गेटस यांनी सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘गिव्हिंग प्लेज’ हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमातंर्गत श्रीमंत व्यक्ती त्यांच्या संपत्तीचा काही भाग समाजकार्यासाठी दान करतात. आजपर्यंत २१ देशांमधील १७१ दानशुरांनी अशाप्रकारे संपत्ती दान केली आहे.

आता या पंक्तीत नंदन निलकेणी आणि रोहिणी यांचाही समावेश होईल. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी आणि त्यांची पत्नी रोहिणी यांनी आपल्या संपत्तीतील अर्धा वाटा समाजकार्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील आघाडीच्या श्रीमंत व्यक्तींमध्ये नंदन निलकेणी यांचा समावेश होतो. निलकेणी दाम्पत्य त्यांच्या संपत्तीमधील अर्धा वाटा म्हणजे जवळपास १७० कोटी रूपये दान करतील.

त्यामुळे ‘गिव्हिंग प्लेज’ उपक्रमातंर्गत संपत्ती दान करणाऱ्या भारतीय दानशुरांची संख्याही चारवर गेली आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण बंगळुरूत राहणार आहेत. यापूर्वी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अझीम प्रेमजी, बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मुझुमदार, बांधकाम व्यावसायिक पी.एन.सी. मेनन यांनीही संपत्ती दान करण्याची प्रतिज्ञा केली होती.

गेल्या दोन दशकांपासून निलकेणी दाम्पत्य जल संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘अर्घ्यम’ या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत. या कार्यामुळे २०१० साली ‘फोर्ब्स’ने आशिया खंडातील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये निलकेणी दाम्पत्याला स्थान दिले होते.

You might also like
Comments
Loading...