पाट्यावरच्या मसाल्याची अन चुलीवरच्या भाकरीची हरवली चव

अक्षय पोकळे: अरे संसार संसार….जसा तवा चुलीवर….आधी हटले चटके मग मिळते भाकर…ही अस्सल मराठामोळ भाव गीत गाताना किचन रूममधील आई दिसत नाही. पाट्यावर मसाला वाटून गावरान भाजीची चव ही आज हरवली आहे. मिक्सरच्या घरघरीत पाट्याची खरखरही इतिहास जमा झाल्यामुळे शहरातील आजच्या लहान मुलांना या पारंपारिक जीवन पद्धतीची कल्पनाच नाही.

Loading...

अत्याधुनिक वस्तूंमुळे मानवाचे श्रम हलके झाले आहे. मात्र श्रम हलके करण्यासाठी गाईले जाणारे भल्लारी गीत, जात्यावरची गाणे, भाव गीते आता काळाच्या पडद्याआड जात आहेत. शहरांमध्ये चुलीवरची भाकरी मिळत नाहीत. तर आता जवळपास ग्रामीण भागातुनही पाटावरोटा हद्दपार झालेला दिसतोय. पाटावरोट्याची जागा आता मिक्सरने घेतली आहे. यामुळे पाट्यावरच्या मसाल्याची चवही हरवून गेली आहे. चुलीवरच्या भाकरी आणि पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची केलेली भाजी आता इतिहास जमा होताना दिसत आहे. शहरांमध्ये किचन रूममधे बनलेल्या स्वयंपाकाच्या चवेच्या तुलनेत चुलीसमोर बसलेल्या आईच्या हाताच्या जेवणाची सर येउच शकत नाही. मराठमोळ्या अनेक जीवन पद्धती पाट्या वरोट्या सारख्या नामशेष होत चालल्या आहेत. तांबड फुटताच चुलीचुलीतून निघणारा धूर अन सुगीच्या दिवसांमधील कामाची लगबग आता दिसत नाही. सांस्कृतिक सण उत्साहाबरोबर विविध परंपरा आज लगबगीच्या जीवन पद्धतीत हव्या असतानाही प्राप्त होऊ शकत नाहीत. सुखप्राप्तीसाठी व्यस्त झालेला माणूस या परंपरेसोबत आपले खरे सुखही लुप्त करत जात आहेत. सिमेंटच्या बंगल्यामध्ये पाटा-वरोटा, उखळ, जात या वस्तू असल्यातरी त्याचा वापर होत नाही हे आजच विदारक सत्य आहे.Loading…


Loading…

Loading...