शिवरायांवरील बायोपिक लवकरच रुपेरी पडद्यावर

रितेश देशमुख करणार निर्मिती ; सलमान खानदेखील छोटीशी भूमिका साकारणार .

टीम महाराष्ट्र देशा-  बालक पालक ,लई भारी व नुकताच आलेला फास्टर फेणे च्या यशानंतर   रितेश देशमुख आता छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी चित्रपट करतोय. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आदर्श असलेल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर हा चित्रपट असल्यानं प्रेक्षकांनाही याविषयी उत्सुकता आहे. मात्र, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढचं वर्ष उजाडेल, असं अभिनेता रितेश देशमुखनं स्पष्ट केलंय.

bagdure

रितेश आणि जेनेलिया देशमुखची निर्मिती असलेल्या ‘फास्टर फेणे’ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या निमित्तानं मुंबई मिररशी बोलताना त्यानं आपल्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली. ‘सध्या आमच्या हातात चित्रपटाच्या संहितेचा पहिला ड्राफ्ट आला आहे. या ड्राफ्टवर सगळ्यांनी मिळून चर्चा केल्यावर त्याला हिरवा कंदिल दाखवला जाईल. संहितेचं सगळं काम पूर्ण झाल्यावर आम्ही चित्रीकरणाला सुरुवात करू,’ असं रितेशनं सांगितलं. हा चित्रपट हिंदीतही बनविला जाईल का, याबाबत अद्याप ठरलं नसल्याचं त्यानं सांगितलं.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटात सलमान खानदेखील छोटीशी भूमिका साकारणार आहे. मराठीत यापूर्वीही शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. परंतु, रितेशनं साकारलेले शिवाजी महाराज कसे असतील, याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

You might also like
Comments
Loading...