देवळाली प्रवरा येथे नवीन पोलिस उपकेंद्र सुरु करावे , नागरिकांची मागणी

devnali pravara

टीम महाराष्ट्र देशा – राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा पोलिस दुरक्षेत्र या कार्यालयाच्या अधिपत्याखाली जवळजवळ 16 गावातील कायदा व सुव्यवस्थेचा भाग अवलंबून आहे.या पोलिस दुरक्षेत्र कार्यालयात कायदा व सुव्यवस्था चोखपणे सांभाळण्यासाठी फक्त 6 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मोजके सहा पोलिस कर्मचाऱ्यांवर या 16 गावांची देखरेख व बंदोबस्त चोख ठेवला जातो ,व तेथील ग्रामस्थ यांचेही संरक्षण ठेवले जाते. आता खरी परीस्थिती अशी आहे की, 3 पोलिस कर्मचारी हे 30 ते 35 वयोगटातील आहेत.  3 पोलिस कर्मचारी हे 35 ते 40 च्या पुढील वयोगटातील आहेत .याच कार्यक्षेत्रातील एक ते दोन पोलिस कर्मचारी यांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे राहुरी पोलिस स्टेशन मधे ङ्युटी साठी एकदा तरी जावेच लागते. त्यातील एक कर्मचारी समन्स बजावणे व संगणकातील नोंदी ठेवून गावंचे देखरेख तपासणे यासाठी असतो.

देवळाली प्रवरा पोलिस दुरक्षेत्र विभागात एकुण सोळा गावे येतात, त्यामध्ये प्रामुख्याने राहुरी फॅक्टरी, कोल्हार बु  गुहा, टाकळीमिया, सेनगाव सात्रळ, नरसाळीचा निम्मा भाग, लाख,जातप, चांदेगाव, ब्राम्हण गाव भांङ, आंबि ङवणगाव, आदी गावे येतात. गमतीशीर बाब अशी आहे की ,जर सोनगाव सात्रळ भागात रात्रीचे वेळेस एखादी अनुचित घटना घडली तर किमान तीन कर्मचारी रवाना होतात पण त्याच वेळेस टाकळीमिया किंवा जातप भागात एखादी अनुचित घटना घडली तर त्यावेळी या पोलीस दुरक्षेत्र मधील कर्मचारी यांची संख्या अपुरी पडते व गुन्हेगारी करणाऱ्यांना राण मोकळे असते.

Loading...

या पोलिस विभागात गुन्हेगारी कमी असली तरी गावांचा भार जास्त असल्या कारणाने सोनई पोलीस स्टेशन च्या पध्दतीने देवळाली प्रवरा येथे नविन पोलिस उपकेंद्र निर्माण करता येउ शकते. अजुन किमान 10 गावे या विभागास जोङल्यास सोनई पोलीस स्टेशन च्या धर्तीवर नविन मुख्यालय होण्यास काहीच अडचण येणार नाही.

सोळा गावातील चाळीस ते पन्नास किलोमिटर चा पेट्रोलिंग चा प्रवास फक्त सहा पोलिस कर्मचाऱ्यांवर असल्या कारणाने गुन्हेगारांना आयते फावते. औटपोस्ट इमारत देखिल गळकी असल्याने दस्तावेज खराब होण्याचा देखिल धोका संभवतो आहे. नवीन पोलीस स्टेशन साठी जागा असुनही इमारतीचे बांधकाम का मंजुर केले जात नाही हा मोठा प्रश्न ग्रामस्थ यांना निर्माण झाला आहे.

सध्याच्या इमारतीसाठी जवळपास नउ हजार रूपयांचे आसपास भाडे आकारले जाते. तत्कालिन जिल्हा पोलीस प्रमुख रावसाहेब शिंदे यांनी या पोलिस दुरक्षेत्र विभागास भेट दीली त्यावेळी ग्रामस्थांना ग्वाही दीली की ,लवकरच नविन पोलिस दुत्रक्षेत्र ची इमारत मंजुर केली जाईल, परंतु आजतागायत हे घोंगडे भिजतच राहिले आहे.

राज्यात भाजपा चे गृहराज्यमंत्री पद असताना, तसेच शिर्डी चे खा.सदाशिव लोखंडे यांचे मतदार संघातील हे देवळाली प्रवरा गाव असताना ते या बाबींकङे निश्निचितच लक्ष वेधतील अशी अपेक्षित मागणी असताना या रखडलेल्या पोलीस दुरक्षेत्र कार्यालय व अपुरी पोलीस कर्मचाऱ्यची संख्या वाढ आदी समस्यांचा निपटारा लवकर व्हावा अशी मागणी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा या परिसरात  गावकऱ्यांनी केली आहे.