रश्मी बागल यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे – गाडे

करमाळा – शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शालेय गणवेशाच्या पैशांमध्ये पंचायत समिती सभापती शेखर गाडे यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या नेत्या रश्मी बागल यांनी केला होता.  पांगरे येथील सभेत बागल यांनी गंभीर आरोप केल्यानंतर संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती . आता बागल यांच्यावर गाडे यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे.रश्मी बागल यांचे मानसिक संतुलन ढासळले असून उठसुठ कुणावरही आरोप करत सुटल्या आहेत असल्याची टीका गाडे यांनी महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना केली आहे.तसेच भ्रष्टाचार केला असल्यास मी राजीनामा देईन असं देखील त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

नेमकं काय म्हणाले शेखर गाडे ?

शासनामार्फत येणारा निधी हा फक्त अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गासाठी येतो तो निधी थेट शालेय समितीच्या खात्यावर जमा होतो. एका ड्रेस साठी 300 तर दोन ड्रेस साठी 600 रुपये येतात.यात शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी कोणताही निधी येत नाही.तरीही आम्ही सर्व शिक्षक संघटनांशी तसेच पंचायत समिती सदस्य,सर्व शिक्षक,मुख्याध्यापक यांच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेतला की,उत्कृष्ट दर्जाचा गणवेश कमी किमती मध्ये जो उपलब्ध करून देईल त्या दुकानदाराला टेंडर देण्यात येईल. यानुसार सर्व शिक्षक नेत्यांनी कापडाचा दर्जा आणि भाव दुकानदारांकडून मागविण्यात आला. केम आणि करमाळ्यातील त्याप्रमाणे दोन दुकानदार टेंडर पद्धतीने निवडण्यात आले. यानंतर पहिली ते चौथी पर्यंत 165 आणि पाचवी ते आठवी पर्यंत 230 रुपये याप्रमाणे गणवेश खरेदी करण्यात आले. उरलेल्या रकमेत खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी गणवेश खरेदी केले.विरोधक आमच्यावर भ्रष्टाचार केला असा आरोप करत आहेत हा आरोप जर सिद्ध झाला तर आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ. बागलाने अजिनाथ आणि मकाई मध्ये भ्रष्टाचार केला आहे हे मी ठामपणे सांगू शकतो.

रश्मी बागल यांचे मानसिक संतुलन ढासळले असून उठसुठ कुणावरही आरोप करत सुटल्या आहेत. भ्रष्टाचार करणाऱ्या बागलांनीच राजीनामा द्यावा.भ्रष्टाचार स्वतः करायचा आणि दुसऱ्यावर आरोप करणे हा त्यांचा उद्योग आहे.लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी त्यांची अवस्था झाली आहे.