मुलीची छेड काढणा-या युवकाकडून मुलीच्या वडिलांना मारहाण

molestation-bid crime

अहमदनगर :अहमदनगर जिल्हातील कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे.हे प्रकरण ताजे असताना व या  प्रकरणाचा निकाल प्रलंबित असताना नगर जिल्हातील छेड काढण्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. नगर मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading...

विद्यालयामध्ये जाणा-या तरूणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणा-या तरूणाने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केल्याची घटना नगर शहरातील माणिकनगर परिसरात घडली.

कोतवाली पोलिसांनी तरूणीच्या फिर्यादीवरून सदर तरूणाच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हर्षल काळभोर असे तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगर शहरातील बुरूडगाव परिसरात असलेल्या एमएसईबी कॉलनीजवळ राहाणारी एक तरूणी कॉलेजमध्ये जात असतांना हर्षल काळभोर या तरूणीचा नेहमी पाठलाग करीत असे. कॉलेजला जाता येता तिचा पाठलाग करून तो या तरूणीला माझा फोन का उचलत नाही,मला तुझ्याबरोबर फ्रेंडशीप करायची आहे,माझ्याबरोबर फिरायला चल असे म्हणून छेडछाड करीत त्रास देत असे.

या प्रकाराने घाबरलेल्या तरूणीने हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.दरम्यान या तरूणाने या युवतीच्या घरासमोर उभे राहून तिला मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.त्यावेळी तरूणीने फोन करून आपल्या वडिलांना माहिती दिली.त्यानुसार वडील तातडीने घरी आले व तरूणास शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. त्यावेळी हर्षल काळभोर याने मला तुमच्याशी बोलायचे आहे,असे सांगून मुलीच्या वडिलांना मोटारसायकल वर बसवून जवळच असलेल्या चंदन इस्टेट परिसरात नेले

.तेथे त्यांना गाडीवरून खाली उतरवून अर्वाच्य शिवीगाळ करीत काळभोर याने या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केली.मारहाणीच्या दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व मोबाईल असा 37 हजार रूपयांचा ऐवज गहाळ झाला आहे.कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक नागवे तपास करीत आहेत.Loading…


Loading…

Loading...