लक्ष्यभेदी ‘राज’ सभेतून मिळणाऱ्या उत्तरांची उत्कंठा

टीम महाराष्ट्र देशा – एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, शनिवारी ठाण्यातील तलावपाळी येथील रस्त्यावर होणार आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर केलेला हल्ला, त्यांच्यावरील अटकेची कारवाई, राज यांच्या सभेला स्थानक परिसरात नाकारलेली परवानगी या सर्व पाश्र्वभूमीवर ही सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने मनसेने शहरभर लावलेल्या फलकांवर ‘कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘मनसे’ देईल’ असे म्हटले असल्याने राज हे शनिवारी काय उत्तर देणार, याची उत्कंठा लागून राहिलेली आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील दुर्घटनेनंतर मनसेने स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना पिटाळूनही लावले होते. या पाश्र्वभूमीवर राज यांची सभा ठाणे स्थानक परिसरातच घेण्याचा मनसेचा इरादा होता. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी परवानगी नाकारली.

bagdure

त्यानंतर तलावपाळीजवळील रस्त्यावर सभेसाठी परवानगी देण्यात आली.दरम्यान, तलावपाळीच्या रस्त्यावर होणाऱ्या या सभेची मनसेतर्फे जय्यत तयारी सुरू आहे. या परिसरात शुक्रवारी सभेला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू होते. महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, महापालिकेमार्फत अशी कोणतीही छाटणी सुरू नसल्याचा दावा पालिकेचे वृक्षप्राधिकरण अधिकारी केदार पाटील यांनी केला.

You might also like
Comments
Loading...