शेवगाव गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी तेजस चव्हाण यांची नियुक्ती

टीम महाराष्ट्र देशा –  :ऊसाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील घोटण-खानापूर येथे रस्तारोको आंदोलन करणा-या शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी श्रीरामपुरचे उपविभागीय दंडाधिकारी तेजस चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.एक महिन्यात चौकशीचे काम पूर्ण करून अहवाल सादर करणचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी चव्हाण यांना दिला आहे. शेवगाव तालुक्यातील गंगामाई शुगर इंडस्ट्रीज कारखान्याने ऊसाकरिता वाढीव दर द्यावा या मागणीसाठी 15 नोव्हेंबर रोजी परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतक-यांनी घोटण,खानापूर येथे रस्ता रोको आंदोलन केले होते.

मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले.शेतक-यांनी आंदोलनादरम्यान टायर जाळून निषेध केला. तसेच पोलिसांवर व वाहनांवर दगडफेक देखील करण्यात आली.पोलिसांनी सुरूवातीला लाठीमार केला.नंतर अश्रुधाराचा वापर केला.मात्र तरीदेखील जमाव शांत होत नसल्याने जमावाला शांत करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला.या गोळीबारात 2 शेतकरी जखमी झाले.गोळीबाराच्या प्रकारा ची चौकशी करून दोषींवर कारवाई करणयाची मागणी शेतकरी करीत होती.

नगरमध्ये जखमी शेतकर्यांना भेटण्यासाठी आलेल्या गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या गोळीबाराची चौकशी दंडाधिकारी यांच्यामार्फत करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी माने यांनी शेवगाव गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची नियुक्ती केली आहे

You might also like
Comments
Loading...