फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा – सुशीलकुमार शिंदे

sushilkumar shinde

टीम महाराष्ट्र देशा –  सरपंच पद हे लहान नसून हे पद भूषविलेले बहुतांश सरपंच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. भविष्यकाळात सरपंचातूनच एखादा मुख्यमंत्री होऊ शकतो. काँग्रेस सर्वसामान्यांचा पक्ष असून हा पक्ष सत्तेपासून दूर गेल्याने सर्वसामान्य व दीनदलितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आगामी काळात या फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

अक्कलकोट येथे काँग्रेस पुरस्कृत निवडून आलेल्या नूतन सरपंच व सदस्यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी
आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. प्रणिती शिंदे, आ. भारत भालके, आ. रामहरी रूपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, गोकूळ शिंदे, जि. प. कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपसभापती प्रकाश हिप्परगी, नगरसेवक चेतन नरोटे, महेश इंगळे, रईस टिनवाला, शहराध्यक्ष भीमाशंकर कापसे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, दीपामाला आडवितोटे, सावित्री पुजारी, विकास मोरे, पं. स. सदस्य विलास गव्हाणे, जि. प. सदस्या स्वाती शटगार उपस्थित होते.