सेनेला लाभार्थींच्या जाहिरातीतही देखील स्थान नाही सुप्रिया सुळेंची सेनेवर कडाडून ठिका

सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा –  सत्तेत असूनही भाजपकडून शिवसेनेला काडीचीही किंमत नाही. सरकारमध्ये असलेली शिवसेना एवढी दुर्लक्षित आहे की लाभार्थींच्या जाहिरातीतही त्यांना स्थान नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दोन दिवसांच्या रत्नागिरी दौ-यावर आल्या असता, चिपळूण तालुक्यामधल्या सावर्डे इथं त्या बोलत होत्या. हिम्मत असेल तर शिवसेनेनं सत्ता सोडावी आणि सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं