सुप्रिया सुळे यांच्यातील रिपोर्टर जेव्हा जागा होतो.

supriya sule as reporter

टीम महाराष्ट्र देशा – असं बोल जात की प्रत्येकामध्ये एक पत्रकार असतो आणि तो कधीना कधी जागा होतो. असच काही झालं आहे राष्ट्रावादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत. राज्यातील विशेषता स्वताच्या मतदार संघातील रस्त्यांची दुरावस्था पाहून त्यांच्यातील पत्रकार जागा झाला आणि सुरु झालं ग्राऊंड रिपोर्टींग.
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: बारामती फलटण रस्त्यावर जाऊन रिपोर्टिंग केलं. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण ? सर्वत्र हेच चित्र असतांना आपले माननीय मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील मात्र खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा असं आवाहन करत आहेत.
अशावेळी सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे मोहीनमेला सुरूवात केली. याला राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही पाठिंबा दिला. तसंच चंद्रकांत पाटीलांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर देण्यासही सुप्रिया यांनी सुरूवात केलीय. खासदार सुप्रिया सुळे यांनी काल बारामती -फलटण रस्त्यावर लोकांची भेट घेतली. समस्या समजून घेतल्या. त्यांच्या मागण्या जाणल्या. इतकंच काय त्यांनी त्या मोबाईल वर रेकॉर्डही केल्या. सरकारला उत्तर देण्यासाठी सुप्रियाताईंनी स्वत: रिपोर्टिंग केलं.
कोकण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ,विदर्भ सर्वच भागातून खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सगळीकडूनच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशावेळी सुप्रिया ताईंच्या मोहीमेमुळे तरी प्रशासनाला जाग येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.