कोण होती राणी पद्मावती?

पद्मावती

टीम महाराष्ट्र देशा –चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसालीद्वारे चित्तोडची महाराणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत राजस्थानात राजपूत करणी सेनेने विरोध केला आहे.याबरोबरच देशभरामध्ये अनेक ठिकाणी पद्मावतीला कडाडून विरोध होत आहे.पद्मावतीचं अस्तित्व होता की ते केवळ ऐक काल्पनिक पात्र होतो यावर प्रश्नच आहे.

rani padmavati
file photo
Loading...

कोण होती पद्मावती आणि काय आहे.
राणी पद्मिनी किंवा पद्मावती यांचं जीवन सिंहालापासून सुरू झालं होतं. त्यांच्या वडीलांचं नाव गंधार्व्सेना आणि आईचं नाव चम्पावती होते. पद्मावती यांच्या लग्नासाठी वडील गंधर्वसेन यांनी स्वयंवर आयोजित केला होता. यात अनेक हिंदू राजा आणि राजपूतांनी सहभाग घेतला होता. चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांचे आधीच अनेक विवाह झाले असतानाही त्यांनी या स्वयंवरमध्ये येण्याचा निर्णय घेतला. दुसरे राजा मलखान सिंह यांना हरवून राजा रावल रतन यांनी स्वयंवर जिंकला.

rani padmavati 2
file photo

१३०२-१३०३ या काळात राजपूत राजा रावल रतन सिंह यांचं राज्य चित्तोडमध्ये होतं. ते सिसोदिया राजवंशाचे होते आणि राणी पदमावती यांच्याआधी त्यांच्या १३ पत्नी होत्या. ते एक पराक्रमी योद्धा होते. राणी पद्मावतींवर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्नही केलं नाही. ते एक चांगले शासक होते. नेहमीच त्यांनी आपल्या प्रजेच्या भल्याचा विचार केला होता.

वडील गंधर्वसेन यांनी पद्मावतीच्या स्वयंवराचे आयोजन केलं. या स्वयंवरासाठी अनेक राजे उपस्थित होते. पण राणी पद्मावतीने चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांच्या गळ्यात माळ घातली. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला ग्रहण लागलं ते दिल्लीच्या तख्ताचं.पद्मावतीच्या सौंदर्याबाबत दिल्लीचा सुल्तान अल्लाउद्दीन खिलजी ऐकून होता. त्यावर भाळलेल्या अल्लाउद्दीननं थेट चित्तोडवर आक्रमण केलं. पण चित्तोड किल्ल्याच्या सात मजली तटबंदीने खिलजी हैराण झाला.

अखेर खिलजीने केवळ पद्मावतीचे मुखदर्शन करण्यासाठी खलिता पाठविला आणि त्यानंतर किल्ल्याचा वेढा काढून घेण्याचं आश्वासन दिलं.पण एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अटही घालण्यात आली.

पद्मावतीच्या मुखदर्शनासाठी खिलजी किल्ल्यात दाखल झाला आणि तिच्या सौंदर्यावर फिदा झाला. त्याने आपला इरादा बदलला आणि राजा रतन सिंहला कैद केलं. जोपर्यंत पद्मावती आपल्याला शरण येत नाही, तोवर राजाला सोडणार नाही, अशी धमकीही दिली.

अखेर पद्मावतीने शरण येण्याची कबुली दाखवली. पण सोबत ७०० दासी घेऊन येण्याची अट घातली.पद्मावतीने ७०० दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या लढवय्या सैनिकांची भर्ती केली. मौका बघून खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली.

deepikas-coschume-for-padmavati-93-kilos
file photo

दगा झालेला पाहून खिलजी चवताळला. घमासान युद्ध सुरु झालं. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला.राणी पद्मावती यांच्यासमवेत तब्बल 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात.

rani padmavati 3
file photo

 Loading…


Loading…

Loading...