राहुल गांधी अहिंदू ? सोमनाथ मंदिरात आढळली नोंद

टीम महाराष्ट्र देशा – गुजरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात मधील अनेक मंदिरांना भेटी देत आहेत . राहुल गांधी यांनी आज प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे नाव हिंदू नसणाऱ्या व्यक्तींच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले आहे. या कारणामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नवा वाद निर्माण झाला आहे. सोमनाथ मंदिरात अहिंदू भाविकांना दर्शन घेण्यापूर्वी याच रजिस्टरमध्ये आपले नाव नोंदवावे लागते.

‘सोमनाथ हे एक हिंदू मंदिर असून हिंदू नसलेल्या व्यक्तीला या मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागेल’, अशी सूचना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सूचना फलकावर लिहिण्यात आली आहे. मंदिराच्या नियमानुसार हिंदू नसणाऱ्या व्यक्तीला प्रवेशासाठी प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये आपले नाव आणि माहिती भरावी लागते.