बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्हॅनमधून कॅश लुटली

crime-1

टीम महाराष्ट्र देशा –सोलापुरात सांगोला तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रची कॅश लुटल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी महाराष्ट्र बँकेची सुमारे 70 लाखांची रोख रक्कम लांबवली.पंढरपूर-सांगोला रोडवरील खर्डी गावाजवळ ही घटना घडली आहे. बोलेरो गाडीतून आलेल्या दरोडेखोरांनी बँकेच्या गाडीला धडक मारुन थांबवली.यानंतर गाडीतून रोकड चोरुन दरोडेखोर पसार झाले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.