सोलापूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष?

सोलापूर :(प्रवीण डोके) लोकसभा निवडणुक जवळ येऊन ठेपल्याने प्रत्येक पक्षाकडून सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. सोलापूर मतदार संघातून माजी  केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याने या मतदार संघाकडे पुन्हा सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1951 ते 2014 या कालावधीत एका पोटनिवडणुकीसह झालेल्या 17 निवडणुकांत तब्बल 12 वेळा या मतदार संघातून कॉंग्रेसचे खासदार झाले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. मोदी लाटेत भाजपचे ऍड. शरद बनसोडे यांचा अनपेक्षित विजय झाल होता.

परंतु यावेळी मात्र परिस्थिती बदलेली पाहवयास मिळत आहे. मोदी सरकारकडून मतदारांना फक्त आश्वासने मिळाल्याने सोलापूरकर काहीसे नाराज आहेत. त्यामुळे ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, त्यातच सुशीलकुमार शिंदे हे पुन्हा उभा राहण्याची शक्यता असल्याने या मतदार संघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहणार आहे. त्याबत या मतदार संघाचा घेतलेला आढावा.

कॉंग्रेस :
उमेदवार : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे
परिस्थिती : २०१९च्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडे सुशीलकुमार शिंदे सोडून दुसरा सक्षम उमेदवारच नाही. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. सोलापूरचा गड परत काँग्रेसकडे आणायचा असेल तर शिंदे यांच्याशिवाय खमका उमेदवार नसल्याचे समजते आहे. शिंदे हेच सोलापूर मतदार संघातून निवडून येऊ शकतात असा विश्वास काँग्रेस नेते आणि कार्येकर्त्यांना आहे.

तसे पाहता २०१४ पासून सोलापूरला ठोस असे काहीच झाले नाही. त्यामुळे या साडेचार वर्षात फक्त घोषणांचा पाऊस पडला आहे. विकासकामे मात्र तितकीशी झालेली दिसत नाहीत. त्यामुळे शिंदे यांच्या पराभवाचा फटका सोलापूरला बसल्याचे मत सोलापूरकरांचे झाले आहे. पुन्हा सुशीलकुमार शिंदेचा हवेत असे सोलापूकर म्हणताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी एक सर्वे झाला होता. त्या सर्व्हेतून सुशीलकुमार शिंदे यांनाच सोलापूरकरांनी पसंती दिल्याचे कळते आहे. त्यामुळे शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून शिंदे हेच संभाव्य उमेदवार आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांचे ही नाव लोकसभेसाठी आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः  प्रणितीचे नाव पुढे केले आहे. परंतु प्रांती शिंदे या लोकसभेला इच्छुक नसल्याने कॉंग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्याकडेच पहिले जात आहे.

भाजप
उमेदवार : विद्यमान खासदार शरद बनसोडे, राज्यसभा खासदार अमर साबळे, बांधकाम व्यावसायिक राजेश मुगळे
परिस्थिती : सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार ऍड. शरद बनसोडे हे पुन्हा इच्छुक आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षातील राज्यसभा खासदार अमर साबळे यांचे नाव पुढे आल्याने बनसोडे काहीसे चिंतेत आहेत. परंतु बनसोडे हे पुन्हा तयारीला लागलेले पाहवयास मिळत आहे. मीच पुन्हा खासदार होणार अशी घोषणाच बनसोडे यांनी केली आहे आणि त्या दृष्टीने तयारी देखील लागले आहेत.

या सगळ्यात सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे खासदार शरद बनसोडे यांनाच तिकीट मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. तर सहकार मंत्री सुभाष देशमुख हे राज्यसभा खासदार अमर साबळे यांना तिकीट मिळवण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे इथून तिकीट कोणाला मिळणार हा प्रश्न अद्यापही स्पष्ट झालेला नाही. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील गटबाजीने टोक गाठले आहे. त्याचा फटका बसण्याच्या भीतीमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थताच असल्याचे मानले जाते.

राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून मतदार संघाचे दौरे वाढविले आहेत. अनेकांच्या गाठी-भेटी विकासकामांची माहिती ते देत आहेत. सध्या सोलापूर मतदारसंघात भाजपचे दोन मंत्री असून महानगरपालिकेवर ही भाजपची सत्ता आहे, आगामी लोकसभेला ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास भाजप नेतृत्वाला आहे.

राष्ट्रवादी
उमेदवार : कोणत्याही नावाची चर्चा नाही.
परिस्थिती : सोलापूरसह ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा चांगला जम आहे. परंतु सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये आघाडीकडे आहे. हा मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीकडून सध्यातरी कोणीही इच्छुक असल्याची चर्चा नाही.

शिवसेना
उमेदवार : कोणत्याही नावाची चर्चा नाही.
परिस्थिती : आगामी लोकसभा निवडणुकीत सध्यातरी शिवसेना-भाजप युती होणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. वेगळे वेगळे लढायची वेळ आलीतर शिवसेनेकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात अद्याप तरी सक्षम उमेदवार दिसत नाही. त्यामुळे ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवारास घेऊन सेनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार असल्याचे चित्र दिसते आहे. सोलापूर मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजूनही शिवसेनेत सामसूम असल्याचे चित्र दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडी
वंचित बहुजन आघाडीचे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातून उभारण्यासाठी एमआयएमकडून आग्रह धरला जात असल्याची माहिती समोर येत आहे आहे. भाजपबरोबर आघाडी असली तरी रिपब्लिकन पक्षातर्फे सोलापूरची निवडणूक लढविण्याची घोषणा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे यांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय होईल हे अद्याप नेमके स्पष्ट नाही.

काय होऊ शकत?
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे दिसत आहे.

विधानसभा मतदार संघ आणि बलाबल
या लोकसभा मतदार संघात विधानसभेचे सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर दक्षिण, अक्कलकोट, मोहळ आणि पंढरपूर मतदार संघ आहेत. कॉंग्रेस तीन, भाजप दोन आणि राष्ट्रवादी एक असे विधानसभेचे बलाबल आहे.

महत्वाच्या बातम्या –