राहुल आतापर्यंत उत्तरांवरुन प्रश्न विचारत होते ते आता स्वत: प्रश्न विचारायला शिकले

rahul gandhi vs smruti irani

टीम महाराष्ट्र देशा – सध्या गुजरात निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. या पार्श्वभूमीवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. राहुल गांधी देखील गुजरात निवडणुकीचे मैदान चांगलेच गाजवत आहे. राहुल सभेतून भाषण तर चांगलेच देत आहेत पण सोशल माध्यमावर राहुल चांगलेच सक्रीय झाले आहेत. मोदींना ते रोज प्रश्न विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरातची अवस्था अशी का केलीत?, तुम्ही दिलेल्या अश्वासनांचे काय झाले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले आहेत. या प्रश्नांवरून राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निशाणा साधला.

जी व्यक्ती आतापर्यंत उत्तरांवरुन प्रश्न विचारत होती ती आता स्वत: प्रश्न विचारायला शिकली असल्याचे स्मृती इराणी यांनी राहूल गांधी यांचे नाव न घेता एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.Loading…
Loading...