संविधान दिन साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

garware collage

पुणे: . पुण्यातील गरवारे महाविद्यालयात संविधान दिन आणि प्रास्ताविकाचे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘शो-क्लॉज’ नोटीस बजावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading...

गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी 26 / 11 च्या हल्ल्याचा निषेध तसेच त्याच दिवशी संविधान दिन असल्याने दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. ती देण्यास दिरंगाई करण्यात आली. मात्र रविवारी संविधान दिन साजरा करण्यात आल्यानंतर आता महाविद्यालयाकडून ‘तुम्हाला कॉलेजमधून का काढले जाऊ नये’ अशी विचारणा केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आता युवासेना आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी प्राचार्यांचा निषेध नोंदवत थेट त्यांच्याच दालनात संविधान प्रास्ताविकाचे वाचन केलं आहे.Loading…


Loading…

Loading...