‘हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा –‘हमसे जो टाकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा हे शिवाजी महाराजांच्याकडूनच आपण शिकलो आहोत तेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास लक्षात घ्या, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले.राजापूर शहरातील जवाहर चौकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे गावागावात उभारले जातात कारण आपल्या महाराजांवर आपलं प्रेम आहे, आपण म्हणतो पिढी बदलतेय… पण जन्माला येणाऱ्या प्रत्येक पिढीत शिवाजी महाराजांवरचं प्रेम वाढतच आहे.
फक्त पुतळे उभारून चालणार नाहीत तर महाराजांचा इतिहास ही आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यावेळी इंग्रजांची वखार राजापूर मध्ये होती आणि इंग्रज सिद्धी जोहर का दारुगोळा, तोफा अशा स्वरूपात मदत करत होते तेंव्हा शिवाजी महाराज राजापूरात आणि ही वखार उध्वस्त केली होती.

आम्ही जनते सोबत आहोत, तुम्हाला जर रिफायनरी प्रकल्प नको असेल तर शिवसेनेचाही रिफायनरी प्रकल्पाला विरोध असेल, उद्या काही लोक म्हणतील सत्तेत राहून तुम्ही विरोध कसा करता?…आम्हाला सत्तेला काय हवंय याची पर्वा नाही. जनतेला काय हवं, काय नको ते महत्त्वाचे आहे, उद्या जनताच सत्ता देणार आहे’, असे सांगताना रिफायनरी प्रकल्पाच्या बाबतीत आम्ही जनतेसोबत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.