शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशात ; सेनेने खाते उघडले

टीम महाराष्ट्र देशा – उत्तर प्रदेशमध्ये आज, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली असली, तरी शिवसेनेने या निवडणुकांमध्ये खाते उघडले आहे. अलाहाबादमध्ये शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला आहे. शिवसनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

शिवसेना उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काही महापालिकांमध्ये रिंगणात उतरली होती. त्यात अलाहाबादमध्ये वॉर्ड क्रमांक ४० मधून त्यांचे दीपेश यादव विजय झाले आहेत. उत्तर भारतातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शिवसेनेने असा विजय मिळविण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.