fbpx

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुणे महापालिकेत खडाजंगी, शिवसेना नगरसेवकांनी महापौरासमोरील पुष्पगुच्छ भिरकावले

pune mahapalika

पुणे : राज्यभर सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद आजके पुणे महापालिकेत पहायला मिळाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेकडून सभागृहात आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आरक्षणावर बोलण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. पण सत्ताधारी भाजपकडून सभा तहकुबी मांडण्यात आल्याने, आक्रमक झालेले शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न करत पुष्पगुच्छ भिरकावून टाकला.

गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात मराठा आरक्षणाचं आंदोलन चांगलेच चिघळल्याचे पाहायला मिळतंय, आधी महाराष्ट्र आणि नंतर मुंबई बंदनंतर आजही राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. दरम्यान, महापालिका मुख्यसभेला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नगरसेवकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आंदोलनास सुरुवात केली. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ची घोषणाबाजी करण्यात आली. तसेच समाजशी गद्दारी सहन केली जाणार नसल्याचं म्हणत सत्ताधारी भाजपवर टीका करण्यात येत होती.

दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच भाजपकडून सभा तहकुबी मांडण्यात आली, त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी महापौर समोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या समोरील पुष्पगुच्छ आणि ग्लास भिरकावून टाकण्यात आला. तर यावेळी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना नगरसेवकांना रेटण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ सभागृह आखाडा झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठा आरक्षणासाठी आणखी एका मराठा आमदाराचा राजीनामा