शिवसेनाही परप्रांतीयांच्या मतांसाठी लाचार – बाळा नांदगावकर

टीम महाराष्ट्र देशा-  शिवसेनेने अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावर ना पालिकेत तोंड उघडले ना रस्त्यावर काही ‘करून दाखवले’. यातून शिवसेनाही परप्रांतीयांच्या मतांसाठी किती लाचार आहे तेच दिसून अशी टीका  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सेनेवर केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची भूमिका मांडली असली तरी मुंबई भाजपचे नेते तसेच पालिकेतील भाजपचे नगरसेवक अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर गप्प बसून असल्याचे नांदगावकर म्हणाले. एरवी रेल्वेचा पुळका असलेले किरीट सोमय्या आता कोठे गायब झाले आहेत असा सवालही त्यांनी केला.

एल्फिन्स्टन पूल बांधणीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री, रेल्वे मंत्री तसेच मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांनी भेट दिल्यानंतर शिवसेनेला डावलले म्हणून टाहो फोडणारे सेनेचे नेते फेरीवाल्यांच्या प्रश्नावर रस्त्यावरही दिसत नाहीत आणि ज्या पालिकेत त्यांना चौथ्यांदा सत्ता मिळाली तेथेही तोंड बंद करून का बसले आहेत, असा सवाल नांदगावकर यांनी केला. मतांसाठी कोणत्याही थराला जाणारे शिवसेना व भाजप आज अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दय़ावर गप्प बसून मुंबईकरांची वाट लावून दाखवत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

 

You might also like
Comments
Loading...