fbpx

कार अपघातातील जखमींच्या मदतीला पवार सरसावले

sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा – अस बोल जात की राजकारणातील माणूसकी हरवली आहे. सत्तेपुढे माणसाला काहीच दिसत नाही पण या गोष्टीला काही राजकारणी अपवाद असतात. असेच एक राजकारणी म्हणजे शरद पवार. पवारांच्यातील माणूसकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे

 

गडचिरोली दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत .नागपूरहून गडचिरोलीला जाताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला होता. अपघाताचं दृश्य पाहून पवारही थबकले आणि त्यांनी स्वत: गाडीतून उतरुन जखमींना मदत केली.

अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेले काही तरुण, वृद्ध यांना पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

मदतीनंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. कोणत्याही गोष्टीचा बाऊ नकरता पवारांनी सहजरीत्या अपघातग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला.शरद पवारांच्या या गोष्टीमुळे पवार महाराष्ट्राच्या व पर्यायाने देशांच्या राजकारणात वेगळे ठरतात.

1 Comment

Click here to post a comment