सलमानने एका सीनसाठी वापरली तब्बल ५००० काडतुसे

सलमानचा ‘टायगर जिंदा है’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात दबंगस्टारने वजनदार गनही चालवली आहे. ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा ‘टायगर’चा सिक्वेल आहे. या सिनेमाचे पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले होते. आता दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाईजान एकटाच दिसत असून त्याने हातात एक बंदूक पकडली आहे.

सलमान सोबत या चित्रपटात कतरिना कैफ देखील झळकणार आहे. एक था टायगर या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे टायगर अभी जिंदा है.

सिनेमात एका सीनचे शूट सुरू असताना हा फोटो टिपण्यात आला आहे. या बंदुकीचे नाव एम.जी ४२ असून वजन २५ ते ३० किलो इतके आहे. हा सिनेमातील महत्वाचा सीन असून यासाठी सलमानने तब्बल ५,००० काडतूसे वापरल्याचे अली अब्बास जफर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...