सदाभाऊंच्या मध्यस्थीनंतर ७४ दिवसांनंतर उपोषण मागे

सोलापूर-कुर्डू येथील शौचालय घरकुल योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १४ ऑगस्टपासून उपोषण, घंटानाद आंदोलन करत असलेल्या मोहन गायकवाड यांनी ७४ व्या दिवशी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेतले. खोत बुधवारी माढा तालुक्यातील कुर्डुवाडी, वरवडे दौऱ्यावर आले होते.

Loading...

कुर्डुवाडी येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषद आटोपल्यानंतर सदाभाऊंना ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यानी पंचायत समितीसमोर आंदोलक मोहन गायकवाड यांच्याशी चर्चा करून प्रकरणी माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हा परिषदेचे पाणी स्वच्छता विभागाचे उपकार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांना कुर्डूचे ग्रामसेवक अन्य संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन अाहवाल देण्यास सांगितले.

त्यानंतर त्यांनी गायकवाड यांना सरबत पाजून आंदोलन मागे घेतले. १४ ऑगस्टपासून सुरू असलेले उपोषण मोहन गायकवाड यांनी ७४ व्या दिवशी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीने मागे घेतले.Loading…


Loading…

Loading...