महिलांचा समावेश होईल त्यादिवशी RSS हे ‘RSS’ राहणार नाही : राहुल गांधी

दिल्ली : दिल्लीत महिला कॉंग्रेसचे संमेलन चालू आहे. या संमेलनात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप वर कडाडून टीका केली आहे. RSS आणि भाजपाची विचारधाराच संकुचित आहे. महिला देश चालवू शकत नाहीत, नेतृत्त्व करू शकत नाहीत अशी RSS आणि भाजपाची धारणा आहे म्हणूनच त्यांना संघात स्थान नाही. RSS आणि भाजप च्या मते फक्त पुरुषच देश चालवू शकतो, महिलांची जागा हि त्यांच्या पाठीमागेच असते.

महिला सक्षमीकरणाबाबत संघ आणि भाजपाची मतांतर आहे. मात्र काँग्रेस महिला सक्षमीकरणाबाबत सक्षम आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षात महिलांना ५० टक्के स्थान असेल असेही त्यांनी जाहीर केले. इतकेच नाही तर ज्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांचा समावेश होईल त्यादिवशी आरएसएस आरएसएस राहणार नाही, म्हणूनच ते महिलांना अकार्यक्षम मानून दुय्यम स्थान देतात असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रउभारणीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे- मोहन भागवत

You might also like
Comments
Loading...