माझी तुलना तुमच्याशी करू नका’ मी काही तुमच्यासारखा लोकांचा पैसा घेऊन पळून गेलेलो नाही

रॉबर्ट वाड्राचे विजय मल्ल्याला प्रतिउत्तर

टीम महाराष्ट्र देशा –  विजय मल्ल्या मी काही तुमच्यासारखा लोकांचा पैसा घेऊन पळून गेलेलो नाही. त्यामुळे स्वत:च्या बचावासाठी माझी तुलना तुमच्याशी करू नका’, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी विजय मल्ल्याला सुनावले आहे.

इंग्रजी वृत्तपत्रांनी वृत्तसंस्थेचा हवाला देत रॉबर्ट वाड्रा यांचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. बँकांचे कर्ज बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय मल्ल्याने लंडन येथे न्यायालयात आपली बाजू मांडताना रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचा उल्लेख केला. आपणही रॉबर्ट वाड्रा यांच्याप्रमाणे राजकारणाचा बळी ठरलो, असे त्याने लंडनमधील न्यायालयात सांगितले. हे वृत्त मीडियाने प्रसिद्ध करताच रॉबर्ट वाड्रा चांगलेच संतापले. ‘स्वत:च्या बचावासाठी मल्ल्या यांनी माझ्या नावाचा वापर केला. हो मी राजकारणाचा बळी आहे पण मी माझ्या पदाचा कधीच गैरवापर केला नाही. मी तुमच्यासारखा लोकांचा पैसा घेऊन देश सोडून पळून गेलेलो नाही. माझा आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे इथे मला नक्की न्याय मिळेल. तुमचा माझा काहीही संबंध नाही त्यामुळे आपली तुलना न केलेलीच बरी’, अशा शब्दात वाड्रा यांनी मल्ल्याचा युक्तिवाद दूर झटकला आहे.

You might also like
Comments
Loading...