रेखाने अभिनय क्षेत्राची निवड एक आवड म्हणून केली नव्हती तर …….

rekha b day

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी रेखा हिने आज (10 ऑक्टोबर) वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास (आता चेन्नई) येथे तिचा जन्म झाला. 1966 मध्ये रेंगुला रत्नम या तेलगू सिनेमात ती बालकलाकाराच्या रुपात झळकली होती.

rekha b day
file photo

रेखाने आपल्या करिअरमध्ये 180 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.. तिचे वडील मिनी गणेशन हे प्रसिद्ध तमीळ अभिनेते होते तर तिची आई पुष्पावल्ली ही प्रसिद्ध तमीळची अभिनेत्री होती. घरातच अभिनयाचा वारसा लाभल्याने अतिशय लहान वयात रेखाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Loading...

रेखाचे वडील प्रसिद्ध अभिनेते असले तरी तिला अतिशय लहान वयापासून संघर्ष करावा लागला. अभिनय क्षेत्राची निवड तिने एक आवड म्हणून केली नव्हती तर घरात आर्थिक चणचण भासत असल्याने ती या क्षेत्राकडे वळली.

rekha b day
file photo

रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फटाकडी’ या मराठी चित्रपटामध्ये ‘कुठं कुठं जायाच हनिमुनला..’ या लावणीवर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा ही राज्यसभा सदस्य आहे. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे२०१२ मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली.

rekha b day
file photo

रेखाचे आयुष्य नेहमीच विवादातच राहिले आहे. विनोद मेहरासोबत रेखाने लग्न करणे त्याच्या कुटुंबाला रुचले नव्हते. रेखा विनोदच्या आईच्या पाया पडायला गेली असता त्यांनी तिला चक्क ढकलून दिले होते. एवढेच नाही तर तिला मारण्यासाठी त्यांनी चप्पल देखील काढली होती आणि रेखाला त्यांनी घरात देखील घेतले नव्हते.

rekha b day
file photo

रेखा यांची जीवनकहानी पुढे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी जोडली गेली. ‘दो अनजाने’ हा या जोडीचा पहिला सिनेमा. या सिनेमापासूनच अमिताभ-रेखा जोडी रसिकांना भावली. यानंतर विविध सिनेमातून अमिताभ-रेखा जोडीनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. दोघांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे आणि सिनेमाच्या यशामुळे रिअल लाइफमध्ये दोघं आणखी जवळ आले. अमिताभ आणि रेखा लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या. मात्र तसं काहीच घडलं नाही.

rekha b day
file photo

रेखा यांनी एका बिझनेसमनशी लग्न केलं. मुकेश अग्रवाल असं या बिझनेसमनं नाव होतं. मात्र लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं, त्यावेळी मुकेश यांनी आपल्या फार्म हाऊसमध्ये आत्महत्या केली. रेखा आणि मुकेश यांच्यात काही तरी बिनसलं आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशा चर्चा त्यावेळी रंगल्या. यानंतर रेखा पुन्हा एकदा जीवनात एकट्या पडल्या. आजही त्यांचा एकाकी जीवनप्रवास सुरु आहे.

१९८१ साली आलेल्या मुजफ्फर अली निर्मित ‘उमराव जान’ने रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला शेवटच्या त्या सुपरनानी या चित्रपटात दिसल्या.

रेखाचे गाजलेले चित्रपट
सावन भादो, ऐलान, रामपुर का लक्ष्मण, धर्मा, कहानी किस्मत की, नमक हराम, प्राण जाए पर वचन ना जाए, धर्मात्मा, दो अंजाने, खून पसीना, गंगा की सौगंध, घर, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, मिस्टर नटवरलाल, खूबसूरत, सिलसिला, उमराव जान, निशान, अगरर तुम ना होते, उत्यव, खून भरी मांग, इजाजत, बीवी हो तो ऐसी, भ्रष्टाचार, फूल बने अंगारे, खिलाडि़यों का खिलाड़ी, आस्था, बुलंदी, जुबैदा, लज्जा, दिल है तुम्हारा, कोई मिल गया, क्रिश, सदियां, सुपर नानी, शमिताभ। चित्रपट

rekha b day
file photo
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!