भारावलेल्या रणवीरने लिहिली भावूक पोस्ट…

maharana-pratap-battalion-oppose-padmavati

पद्मावती चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोचली होती. चित्रपटाच्या पोस्टर नंतर दीपिकाचा राणी पद्मावतीच्या लुक मधील पोस्टर रिलीज झाले. दीपिकाने पुन्हा एकदा तिच्या सौदर्याची भुरळ सर्वांनाच घातली. त्या पोस्टर नंतर उत्सुकता आणखी वाढली. दीपिकाच्या पोस्टर नंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते रणवीर सिंगच्या लुककडे कारण रणवीर पहिल्यांदाच विलनच्या रोल मध्ये समोर येणार होता. आणि रणवीरच्या लुकचे पोस्टर रिलीज झाले आणि त्या पोस्टरने सर्वत्र धुमाकूळ घातला. आता लक्ष लागले होते ते  ट्रेलरकडे काल  ट्रेलर रिलीज झाला आणि पद्मावतीच्या कलाकारांवर शुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला. केवळ चाहत्यांनीच नाही तर चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनीही रणवीरच्या कामाची प्रशंसा केली. रणवीर व दीपिका यांनी सर्वांचे आभार मानले.

Loading...

आभार मानताना रणबीर भावूक झात्याने लिहिलंय की, वरिष्ठ सहकारी, मित्र, मीडिया, व्यापार समीक्षक आणि सर्वात महत्त्वाचे आमचे प्रेक्षक या सर्वांचे ‘पद्मावती’च्या ट्रेलरवर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी मी मनापासून आभार मानतो. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कौतुकाचा साक्षीदार होण्याचा अनुभव अभूतपूर्व आहे. हे खूपच दुर्मिळ आहे.

 

 Loading…


Loading…

Loading...