राणेंनी अगोदर आमदार तरी होवून दाखवावे सेनेच्या दुधवडकरांचा राणेंना टोला

narayan rane

टीम महाराष्ट्र देशा – नारायण राणे यांनी अगोदर आमदार होवून दाखवावे आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री व्हा किंवा मंत्री व्हा, असा टोला शिवसेनेचे नेते अरुण दुधवडकर यांनी नारायण राणे यांना लगावलाय.संध्या शिवसेनेचे नेते गृहराज्यमंत्री दिपक केसकर आणि नारायण राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होतायत. त्या पार्श्वभूमीवर अरुण दुधवडकर यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतलाय.

त्याचप्रमाणे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं सध्या लक्ष्मीचं वरदान आहे. म्हणून ते हवं तसं वागत आहेत. पण उद्या ही लक्ष्मी आमच्याकडं पण येईल हे दादांनी विसरु नये, असं शिवसेनेचे नेते अरुण दुधवडकर यांनी म्हटलंय. राणेंना शिवसेनेतून जोरदार विरोध होत असून राणेंचे राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.