राम मंदिर प्रकरणी योगी व रविशंकर एकवटले ;प्रश्न निकाली निघण्याची शक्यता.

yogi and ravishankar

टीम महाराष्ट्र देशा – अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर लवकरच तोडगा निघण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. आणि त्यासाठीच्या हालचालींना वेगही आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. विशेष म्हणजे उद्या श्री श्री रविशंकर अयोध्येलाही भेट देणार आहेत. तर तिकडे अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी शिया वक्फ बोर्डानं सहमती दाखवली आहे.

राम मंदिराच्या वादावर चर्चा करण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष महेंद्र गिरी यांच्यात सकारात्मक बैठक झाली. पण शिया बोर्डाच्या भूमिकेवर सुन्नी बोर्डानं आक्षेप घेतला आहे.दरम्यान अयोध्या वादाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 5 डिसेंबरपासून अयोध्या वादावर तीन न्यायधीशांच्या खंडपीठाकडून सुनावणी सुरु होणार आहे.