fbpx

राम कदमांना आली उपरती; ट्वीट करून मागितली माफी

घाटकोपर येथील दहीहंडीच्या उत्सवात भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्य केलं या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी राम कदम यांच्यावर टीका केली. त्यांना आमदार पदावरून काढून टाका असे मुख्यमंत्र्यांना आव्हानही करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी महिलांनी आणि युवतींनी राम कदम यांचा निषेध करत आंदोलनेही केली. या सर्व प्रकारानंतर अखेर रान कदम यांन आज उपरती आली आहे. त्यांनी ट्वीट करून सर्व महिला वर्गाची माफी मागितली आहे.

‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हित शत्रूंनी हा वाद निर्माण केला त्यामुळे माता भगिनींंची मने दुखवली गेली. झाल्याप्रकरणी मी दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.’ अशा शब्दात आमदार राम कदम यांनी माफी मागितली.