fbpx

शिक्षण हे डोक्यावरील पदरापेक्षा जास्त महत्वपूर्ण – शशी थरूर

shashi taroor

टीम महाराष्ट्र देशा – निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. आता याप्रकरणात काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी उडी घेतली असून त्यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना मार्मिक सल्ला दिला आहे. पद्मावती चित्रपटामुळे सुरू असलेल्या वादामुळे राजस्थानी महिलांच्या स्थितीवर लक्ष वेधण्याची ही नामी संधी असल्याचे सांगत शिक्षण हे डोक्यावरील पदरापेक्षा जास्त महत्वपूर्ण असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. पद्मावती चित्रपट हा सहा शतकांपूर्वीच्या महाराणीवर नव्हे तर राजस्थानी महिलांच्या स्थितीवर ध्यान केंद्रित करण्याची एका नामी संधी आहे. राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे. पदरापेक्षा शिक्षण खूप महत्वाचे आहे, असे थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

1 Comment

Click here to post a comment