राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच- सुब्रमण्यम स्वामी

swami

यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची  टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली. सुब्रमण्यम स्वामी हे डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या एका खासगी कार्यक्रमासाठी जो काही मराठी अस्मिता जपणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नाने आयोजित केला होता तिथे आले होते.

राज ठाकरे व एक यूपीचा रिक्षावाला यांचा डीएनए तपासला तर दोघांचा डीएनए नक्कीच एक निघेल, असे वक्तव्य त्यांनी या जाहीर कार्यक्रमात केले. याशिवाय यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज यांनी आपल्याला डीएनएबाबत आव्हान केल्यास राज यांचा डीएनए यूपीचाच असल्याचे सिद्ध करून दाखवू, असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच राज यांना हे माहीत असल्यानेच ते सध्या यूपीवाल्यांच्या विरोधात बोलत नसल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

स्वामी  यांच्या या वक्तव्यानंतर  मनसे कार्यकर्त्यानी या ठीकेचा तीव्र निषेध केला आहे.मराठी माणसाचा अपमान कराल तर सोडणार नाही मनसे कार्यकर्त्यांचा सुब्रमण्यम स्वामींना इशारा दिला आहे