अमराठी पोलीस अधिकाऱ्याकडून मनसे शहराध्यक्षास कोठडीत मारहाण

mns flag

टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. मनसेला ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळील अशोक टॉकीज किंवा तलावपाळी मार्गावर सभा आयोजित करायची आहे. मात्र रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली आहे.

स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी अविनाश जाधव यांना व त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत एका अमराठी पोलीस अधिका-याने जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने जेमतेम १५ हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची सुटका केली.