‘टायगर जिंंदा है’चा ट्रेलर ‘लवकरच रसिकांंच्या भेटीला

जाणून घ्या कधी येणार टायगर जिंदा है चा ट्रेलर

सलमान खान व कैतरिना कैफचा बहुचर्चित सिनेमा टायगर जिंदा है लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.२०१२ सालचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘एक था टाईगर’ च्या सीक्वेलची रसिकांमध्ये उत्सुकता आहे.काही दिवसांपूर्वी दुबई आणि अबुधाबीमध्ये या चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रिकरण पूर्ण झाले आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांसमोर येणार आहे.

ख्रिस्मसच्या मुहुर्तावर हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होईल.

तब्बल सहा वर्षांनी सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अबुधाबीमध्ये सुमारे ६५ दिवस या चित्रपटाचे विविध ठिकाणी शुटींग करण्यात आले आहे.

सध्या शुटींग संपले असून या चित्रपटाचे एडिटिंग सुरू आहे.’टायगर जिंदा है’ या चित्रपटाबाबत रसिकांमध्ये खूपच उत्सुकता असल्याने अनेकांनी स्वतःहून या चित्रपटाचे पोस्टर बनवून सोशल मिडीयामध्ये शेअर केले आहेत.