fbpx

मोदींची नक्कल करणे तरुणाला पडले महागात .

sham rangila

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर श्याम रंगीला हा नरेंद्र मोदी यांची हुबेहूब नक्कल करतो, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, चॅनेलने रेकॉर्ड केलेला हा भाग प्रसारित करण्यास नकार दिला आहे. तसेच आपली कार्यक्रमातून हकालपट्टी केल्याचा आरोप त्याने ‘द वायर’ बोलताना केला आहे.

‘मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करतानाचा हा भाग रेकॉर्ड झाला, आणि जवळपास 1 महिन्यांनंतर मला कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीमकडून फोन आला. टीमने मला पुन्हा नव्याने रेकॉर्डींगसाठी बोलावले. यानंतर मोदींची नक्कल करतानाचा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला. तू राहुल गांधींची नक्कल करू शकतो, मात्र मोदींची नाही, असे मला या चॅनेलकडून सांगण्यात आले, असा आरोप ‘द वायर’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्याम रंगीलाने केला आहे.

कॉमेडीयन श्याम रंगीलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करण्यात श्याम रंगीला प्रसिद्ध झाला आहे. स्टार प्लस चॅनलने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचे नवीन शो सुरू झाल्यापासून श्याम रंगीला चर्चेत आहे.