मी सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार, पण ……- राहुल गांधी

राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा – राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आज याविषयी सोनिया गांधी, मनमोहन सिंह आणि आणखी काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.

या बैठकीत राहुल गांधी यांनी एक वाक्य सर्वांसमोर म्हटलं, मी सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्यास तयार, यावर कुणालाही काहीही शंका असल्यास बैठकीत ते मोकळ्यापणाने आपलं मत मांडू शकतात.काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीने पक्षाच्या अध्यक्षपदासाठी प्रस्तावित तारीख सोनिया गांधी यांना कळवली आहे. काँग्रेस कार्यकारिणीकडून राहुल गांधींच्या नावावर अंतिम मोहर लागल्यानंतरच अधिकृत घोषणेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

काँग्रेस कार्यकारिणीला तारखेत बदल करण्याचेही अधिकार आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ डिसेंबरला राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.