पळपुटे मुंढे घोषणाने सभागृह दणाणले …

tukaram-mundhe

टीम महाराष्ट्र देशा – पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी बुधवारी काही वेळातच काढता पाय घेतला. सभागृहाला कल्पना न देताच मुढे निघून गेल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात गोधळ घालत मुंढेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

पीएमपीला निधी देण्यासाठी बुधवारी महापालिकेत खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक सभाना दांडी मारणारे पीएमपीचे मुढेंनी या सभेला हजेरी लावली आणि पीएमपी कामकाजाचा आढावा सभागृहात सादर केला. त्यानंतर नगरसेवकांच्या भाषणाला सुरूवात झाली. त्यात मुढेंच्या कामकाज पध्द्तीवर टीका करीत या नगरसेवकांनी त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

ही सभा सुरू असतानाच मुढे अचानक सभेतून उठले आणि सभागृहातून बाहेर पडले. मुढे अचानक निघून गेल्याचे लक्षात आल्यावर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांपुढे येऊन गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यानंतर अशा घोषणा देऊन नगरसेवकांनी निषेधाच्या घोषणा दिल्याLoading…
Loading...