पुणे: मुलाकडून आई वडिलांची निर्घृण हत्या

पुणे: आई वडिलांची हत्या करून मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. पुण्यातील शनिवार पेठ भागात हा धक्कादायक प्रकार घडला असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रकाश दत्तात्रय क्षीरसागर (वय 60) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55) रा शनिवार पेठ अशी हत्या झालेल्या आई वडिलांच्या नावे आहेत. तर पराग क्षीरसागर असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने वडिलांच्या गळ्यावर चाकूने वार करत तर आईची दोरीने गळा आवळून हत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी 9. 30 च्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान आरोपी हा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.