धरणं भरलेली असूनही पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट.

pune water supply

टीम महाराष्ट्र देशा – शहरात चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा योजनेची चर्चा सुरु असतानाच पुण्याचा पाणी कोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला आहे.शहराची लोकसंख्या आणि पाणीवापराचे निकष लक्षात घेऊन पुणे महापालिकेला वार्षिक 8.19 टीएमसी पाणीपुरवठा करण्यात यावा, असं या आदेशात म्हटलंय. सध्या वर्षाला सुमारे 15 टीएमसी पाणी वापरणाऱ्या पुणे पालिकेला या आदेशामुळे मोठा झटका बसलाय.

या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात धरणं भरलेली असूनही पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झालीय. जलसंपदा विभागाच्या या आदेशामुळे पालिकेच्या तोंडचं पाणी पळालं असून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.