प्राध्यापकांसाठी गुड न्यूज ; सातवा वेतन आयोग लागू .

पगारात 22 ते 28 टक्क्यांनी वाढ होणार

दिवाळीच्या मुहुर्तावार प्राध्यापकांना आनंदाची बातमी. प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. देशातल्या 7 लाख 51 हजार प्राध्यापकांना याचा लाभ होणार आहे. देशातली 329 विद्यापीठे आणि 12 हजार 912 महाविद्यालयांना याचा लाभ होणार आहे.

तसंच केंद्राचं अनुदान मिळणा-या अभिमत विद्यापीठे आणि 43 केंद्रीय विद्यापीठांच्या प्राध्यापकांनाही याचा फायदा मिळणार आहे. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगामुळे प्राध्यापकांच्या पगारात 22 ते 28 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचीही माहिती जावडेकरांनी दिली आहे.