मोदींनी केले ट्रम्प यांचे सांत्वन

टीम महाराष्ट्र देशा – अमेरिकेतील मॅनहॅटन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शोक व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक संकट ठरलेल्या दहशतवादाविरोधात एकत्रितपणे लढण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे. मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांवर ट्रक घुसवत दहशतवादी केला. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून अधिक लोक जखमी आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बातचीत करत सांत्वन स्विकारलं. मोदींनी यावेळी दहशतवादाचा तीव्र निषेध केला असून, मृत आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना केली आहे. ‘जागतिक संकट ठरलेल्या दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका आपला लढा यापुढे कायम ठेवतील यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं आहे’, अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे.

याआधी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत हल्ल्याचा निषेध केला होता. मृतांच्या परिवाराच्या आणि जखमींच्या दु:खात मी सहभागी आहे, असं ट्वीट मोदींनी केलं होतं.

You might also like
Comments
Loading...