मनसे कार्यकर्त्यावर पोलिसी कारवाईचा बडगा .

मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी कलम १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या गेल्या आहेत.

टीम महाराष्ट्र देशा –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले आहे. संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतली निरुपम यांनी पोलीस मनसे कार्यकर्त्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप देखील केला. यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यावर कारवाई पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे.

फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसैनिकांना चाप लावण्यासाठी आता पोलिसांनी पावलं उचलायला सुरवात केली आहे. मुंबईत अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी कलम १४९ अंतर्गत नोटीसा बजावल्या गेल्या आहेत.

मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांकडून कायदा हातात घेणार नाही असं हमी पत्र लिहून घेण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या अनेक भागात फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मनसेनं आंदोलन केलं. त्यावेळी फेरीवाल्यांना मारहणाही झाली.

अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांचे धंदे उडवून लावले. त्यातून पुढे मालाडमध्ये फेरीवाले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असे प्रकार घडू नयेत म्हणून आता पोलिसांनी आधीच खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे

You might also like
Comments
Loading...