वंदे मातरम व शिवाजी महाराजांचे तैलचित्रही पालिकेच्या शाळांमध्ये अनिवार्य

pmc

टीम महाराष्ट्र देशा – पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीने गायलं जावं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र बसवावं असा प्रस्ताव शुक्रवारी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम गाणं आणि शिवाजी महाराजांचे तैलचित्र ठेवणं अनिवार्य झालं आहे.
हा प्रस्ताव शुक्रवारी पुणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणला गेला होता

. हा प्रस्ताव महापालिकेत शिवसेनेकडून मांडला गेला होता. यावर चर्चाही करण्यात आली. या चर्चेत राष्ट्रवादीकडून कोर्टाच्या निर्णयाची आठवण राष्ट्रवादीने करून दिली. वंदे मातरम ऐच्छिक असावं त्याची सक्ती नसावी असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यामुळे वंदे मातरम ऐच्छिक करण्याची उपसूचना राष्ट्रवादीने मांडली. पण भाजप सेनेने बहुमताच्या जोरावर ही उपसूचना फेटाळली आहे.त्यामुळे आता पुण्यातील महापालिकांच्या शाळांमध्ये वंदे मातरम गायले जाणार असून शिवाजी महाराजांचे तैलचित्रही दिसणार आहे.