fbpx

वसंतदादामुळेच शरद पवार त्यावेळी मुख्यमंत्री झाले डॉ. पतंगराव कदमांचा गौप्यस्फोट

टीम महाराष्ट्र देशा- वसंतदादांचे सरकार शरद पवार यांनी पाडले, मात्र यानंतर ज्यावेळी वेळ आली तेव्हा शरद पवारांशिवाय पर्याय नाही, राज्य चालविण्यासाठी पुढे दुसरी योग्य व्यक्ती नाही असे सांगून पवारांना वसंतदादांनीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविले असा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकार संघटनेच्या ‘वसंतदादांच्या आठवणी’ या कार्यक्रमात बोलताना केला.

आणीबाणीच्या काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा दादा बेचैन झाले. काँग्रेसचे घर जळायला लागल्यानंतर कसा गप्प बसू, असा सवाल त्यांनी केला होता. आज राजकारणातील सर्व मंडळी सांगतात आम्ही शेतकऱयांची मुले आहोत. आता कुणाला किती शेतातलं कळतंय हा प्रश्नच आहे, परंतु खरा शेतकऱयांचा मुलगा वसंतदादाच होते, असे पतंगराव म्हणाले.