निवडणूक लढवण्यास राणे अनुत्सुक

पर्यायी मार्गाचा विचार सुरु

टीम महाराष्ट्र देशा –  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आगामी विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस सोडताना विधान परिषद सदरस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येत्या 7 डिसेंबरला होणारी विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास राणे अनुत्सुक असल्याचे वृत्त आहे. मात्र नारायण राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवतील आणि भाजपा त्यांना पाठिंबा देईल, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

bagdure

नारायण राणे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.एकट्या भाजपाकडे 122 मते असली तरी 145 मतांचा आकडा गाठणे भाजपासाठी अवघड आहे. त्यामुळे निवडून यायचे असल्यास राणेंना काही आमदारांची मते फोडावी लागणार आहे. हे एकंदरीत चित्र पाहून नारायण राणेंनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवता काही महिन्यांनंतर होणार विधान परिषदेची निवडणूक लढवून राणेंना विधान परिषदेत पाठवण्याचा विचार भाजपाकडून होऊ शकतो.

You might also like
Comments
Loading...