fbpx

राष्ट्रवादीवर ‘साडेसाती’ ? पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर एकत्र शनी दरबारात

टीम महाराष्ट्र देशा : शनिमहाराजाची वक्रदृष्टी राहू नये, त्यांची कृपा राहावी यासाठी सोमवारी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राक्षसभुवन येथील मुख्यपीठ असणाऱ्या शनी महाराजाचे दर्शन घेतले.

भविष्यात साडेसाती आणी ग्रहदशांपासून लांब ठेव अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र जयदत्त क्षीरसागर यांची भाजपशी जवळीक पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसवर मात्र ‘साडेसाती’ येणार असल्याचे दिसत आहे.

गोदावरी तीर्थावर पांचाळेश्वर येथे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांचा अवतार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर येथे आले होते. त्यावेळी जवळच असलेल्या राक्षसभुवन येथे जाऊन शनीच्या साडेतीन पिठापैकी एक आलेल्या शनिमहाराजांच्या मंदिराचे दर्शन घेतले.

निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. क्षीरसागर नुकतेच भावासह मुख्यमंत्र्याच्या वर्षा या बंगल्यावर गणपतीच्या आरतीसाठी आले होते. त्यानंतर आज त्यांनी आणि पंकजा मुंडे शनिमहाराजांचे दर्शन घेतले.

2 Comments

Click here to post a comment