पद्मावतीचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता

१ डिसेंबरला होऊ घातलेले ‘पद्मावती’चे प्रदर्शन आता लांबणीवर पडण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा – ‘पद्मावती’ चित्रपट सेन्सॉर बोर्डाने आज निर्मात्यांना परत पाठवला असून मार्गदर्शक तत्त्वानुसार त्या चित्रपटाचे पुन्हा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबरला होऊ घातलेले ‘पद्मावती’चे प्रदर्शन आता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘पद्मावती’ चित्रपट काही तांत्रिक कारणांमुळे निर्मात्यांना परत पाठविण्यात आला असल्याचे सेन्सॉर बोर्डातील सूत्रांनी स्पष्ट केले.

You might also like
Comments
Loading...